म.. ए. सो. वर्धापन दिन 2021-22

. . सो.विद्या मंदिर, बेलापूर

. . सो. वर्धापन दिनाचा अहवाल

म. ए. सो. विद्या मंदिर बेलापूर शाळेत १९ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा “वर्धापन दिवस” शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमती स्वाती चुडजी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापुरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. म.ए.सो. गीताची ध्वनी फीत ऐकविण्यात आली. श्रीमती स्वाती चुडजी यांनी संस्थेचा इतिहास व आपले अनुभव थोडक्यात व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अशा प्रकारे वर्धापन दिवस उत्साहात संपन्न झाला.

 

Scroll to Top