महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे विद्या मंदिर बेलापूर शाळेत दिनांक 10/8/2022 रोजी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला गेला. प्राचार्या माननीय श्रीमती शुभांगी शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा मध्ये रक्षाबंधन चे महत्व व पुरातन इतिहास मुलांना गोष्टी स्वरूपात सांगण्यात आला.हा सण म्हणजे सुरक्षितते चे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे.या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी आपल्याला देते . अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शालेय अभ्यासातून नैतिक मूल्यांची जाण ठेवून रक्षाबंधन निमित्त प्राणीपक्षी,झाडे, आपला तिरंगा, स्वतःची सुरक्षा,आपल्या जवळ पास एकटे राहणारे आजीआजोबा यांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली. दैनंदिन जीवनात तसेच व्यवहारात स्वतः पासून सुरूवात करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले .विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून राख्या व
भेटकार्ड तयार केली .इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या विषयावर गाणं सादर केलं .कार्यक्रमाच्या शेवटी
मा. प्राचार्या शुभांगी शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व रक्षाबंधन सणासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.