एम.ई.एस विद्यामंदिर माध्यमिक शाळा
बेलापूर
गणेशोस्तव हा हिंदू धर्मीयांचा महत्वपूर्ण उत्सव आहे. गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते.सर्व प्रकारच्या शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. घराघरात गणपतीची मुर्ती आणून भक्तिभावाने तिची पूजा केली जाते. गणेश ही विद्येची व संकट निवारण करणारी देवता आहे. बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उस्ताहाचे वातावरण घेऊन येत असतो . आगमनापुर्वी कितीतरी दिवसाआधीपासून तयारी सुरु होत असते .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या एम.ई.एस.विद्यामंदिर शाळेत ‘’अविष्कार एजुकेशन फाउंडेशन’ यांच्या तर्फे पर्यावरण पूरक गणेश मुर्ती बनवण्याची तीन दिवसीय कार्यशाळा विद्यार्थी ,पालकांसाठी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. या कार्यशाळेत इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत गणपती तयार करण्यापासून ते कलाकुसर ,रंगकाम, सजावट, कारखान्यातील कामकाज याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. ‘मनातील बाप्पा’ या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून अतिशय सुंदर गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळाले . इयत्ता१ली ते४थी च्या विद्यार्थ्यांनी मनातील बालगणेशाचे चित्र देखील वेगवेगळ्या चित्रस्वरुपात काढले इयत्ता५वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यानी बुद्धीचा विविध कौशल्यांचा उपयोग करून बाप्पाचे सुंदर चित्रण केले. गणपती हा स्थिर बुद्धी आणि शांत स्वभावाचा आहे. एका हातात मोदक असणे हे ज्ञान, निष्ठा, ज्ञानरस या परिपूर्ण स्थितीचे दर्शन आहे. सफलतेचे प्रतिक आहे थोडक्यात मोदक हपरिश्रम, तपस्या बुद्धिबळाच्या आधारावर आनंद प्राप्त केल्याचे सूचक आहे गणेशाला प्रिय असणारे खाद्य पदार्थ म्हणजे मोदक,लाडू. अर्थातच गणपती हे कलेच दैवत आहे .जसे गणेशाचे रूप कलात्मक स्वरुपात दिसून येते त्याचप्रमाणे मोदक बनविणे ही पण एक कलाच आहे इयत्ता ९ वी १० वी च्या विद्यार्थी ,पालक व शिक्षकांसाठी सौ . सुनिता कामेरीकर यांची कार्यशाळा आयोजित केली होती .या कार्यशाळेत पारंपारिक, पौष्टिक मोदक सोप्या पद्धतीने बनविण्याची कृती छोट्या छोट्या टिप्स या कार्यशाळेत देण्यात आल्या.यातून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत मोदक बनविण्याचा आस्वाद घेतला.