11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस
11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर, बेलापूरशाळेत महिला पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली गेली.
ही कार्यशाळा “इनर विल ऑफ नवी मुंबईबेसाईड”यांच्या वतीने आयोजित केली गेली. आजच्या कार्यशाळेतकार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षाडॉ. कविता कणसे,स्त्री रोग तज्ञ,मीनाताईठाकरे रुग्णालय, नेरूळ तसेच इनरव्हील क्लबचे प्रेसिडेंट काजल खुल्लारे सेक्रेटरी सबीहा शेख या सर्वांचेमुख्याध्यापिका सौ. शुभांगी शिंदे यांनी स्वागत केले.
या कार्यशाळेतडॉ.कविताकणसे यांनी वाढती लोकसंख्या यावर विस्तृत अशी माहिती दिली प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी कशी घ्यावी तसेच महानगरपालिकेच्या वतीने कुटुंब नियोजनावर आधारित विविध योजनाबद्दल त्यांनी पालकांनामार्गदर्शन केले
वाढती लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
खास करून शाळेत महिला पालकांना बोलावून त्यांच्यात कुटुंब नियोजनाबाबत सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेत कुटुंब नियोजनाची साधनेव औषधांचे वाटप करण्यात आले.
.